कसाबचा खोटारडेपणा सुरूच

January 18, 2010 1:19 PM0 commentsViews: 2

18 जानेवारी26/11 च्या हल्ल्यात ठार झालेल्या नऊपैकी चार अतिरेकी भारतीय असल्याचा दावा कसाबने केला आहे. यातील एक अतिरेकी काश्मीरचा तर दुसरा गुजरातमधला होता असंही कसाब म्हणाला. तसंच या अतिरेक्यांचे फोटो पाहिल्यानंतर यापैकी दोघे मुंबईचे असल्याचा दावाही कसाबने केला. पण यापूर्वी आपल्याला या अतिरेक्यांबद्दल काहीच माहिती नसल्याचा जबाब कसाबने दिला होता. कसाबच्या या जबाबाबद्दल विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी तो खोटं बोलत असल्याचं म्हटलं आहे. यापूर्वी झालेल्या जबानीतही त्याचा खोटारडेपणा उघड झाला होता.

close