हुल्लडबाजी करणार्‍यांना राज ठाकरे यांनी सुनावले खडे बोल

January 18, 2010 1:21 PM0 commentsViews:

18 जानेवारी पुण्यातल्या कार्यक्रमात वंदेमातरम सुरू असताना विद्यार्थी आणि प्रेक्षकांनी केलेल्या हुल्लडबाजीवर राज ठाकरे यांनी आयोजकांना आणि प्रेक्षकांना खडे बोल सुनावले. राज ठाकरे यांच्या हस्ते पत्रकारितेत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल 'चौथा स्तंभ पत्रकारिता पुरस्कार' देण्यात आले. एमआयटी कॉलेजच्या विद्यार्थांनी या संपुर्ण कार्यक्रमादरम्यान घोषणा आणि आरोळ्यांनी सभागृह दणाणून सोडलं होतं. अखेर ही हुल्लडबाजी सहन न झालेल्या राज ठाकरेंनी आपल्या भाषणाच्यावेळी विद्यार्थ्यांना खडे बोल सुनावत भाषण करायला नकार दिला.

close