नवी मुंबईच्या ऍडिशनल कलेक्टरना मारहाण

January 18, 2010 1:23 PM0 commentsViews: 7

18 जानेवारीअतिक्रमण हटविण्यासाठी गेलेल्या ऍडिशनल कलेक्टरना आमदारांच्या उपस्थितीत मारहाण करण्यात आली. खारघर मध्ये वीट भट्टी हटविण्यासाठी गेलेले ऍडिशनल कलेक्टर सुमंत भांगे यांना मारहाण करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे आमदार प्रशांत ठाकूर आणि शेकापचे आमदार विवेक पाटील हे दोघेही तिथे होते. त्यांच्या चिथावणीमुळेच भांगे यांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी खारघर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

close