पुण्यात विसर्जनादरम्यान हे रस्ते असणार बंद

September 26, 2015 11:25 PM0 commentsViews:

pune visarjan26 सप्टेंबर : सांस्कृतिक राजधानी पुण्यात गणेश विसर्जनाची धूम काही वेगळीच असते. यंदा पाचही मानाच्या गणपतीचं विसर्जन हौदात करण्यात येणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आलंय. आज मध्यरात्रीपासून पुण्यातील विसर्जन मिरवणुकी दरम्यानचे रस्ते बंद होणार आहे. दरम्यान,विसर्जन सुरक्षेत पुणेकर ही हातभार लावणार आहे. पुणे पोलिसांनी एक हजार ज्येष्ठ नागरिक, कॉलेजचे विद्यार्थी यांनी विशेष पोलिसांचा अधिकार दिलाय. या तरुण आणि तरुणीना एका दिवसासाठी पोलीस दलातील विशेष अधिकार बहाल करत त्यांना आता बंदोबस्ताची जबाबदारी दिली आहे.

  हे रस्ते बंद

- मुख्य विसर्जन मिरवणूक मार्गावरील सर्व रस्ते बंद राहणार
– लक्ष्मी रोड, भोंडे पथ, रामेश्वर चौक ते शनिपार चौक फक्त एकेरी पादचारी वाहतुकीसाठी खुले
– लक्ष्मी रोड – टिळक चौकातून बेलबाग चौकाकडे येण्यास बंदी
– भोंडे पथ – मोती चौकातून आप्पा बळवंत चौकाकडे येण्यास बंदी
– टिळक रोड, बाजीराव रोड, कुमठेकर रस्ता, केळकर रोड फक्त पादचार्‍यांसाठी खुले
– मुख्य विसर्जन रस्त्यावर 100 मी. परिसरात पार्किंगला बंदी
– अलका चौक ते डेक्कन जिमखाना हा रस्ताही बंद राहणार

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close