ज्योती बसूंना अखेरचा लाल सलाम

January 19, 2010 8:44 AM0 commentsViews: 2

19 जानेवारी कॉम्रेड ज्योतीबसूंना शासकीय इतमामात आणि लाखो लोकांच्या उपस्थितीत मोहरकुंज इथं अखेरची सलामी देण्यात आली. यानंतर SSKM मेडिकल कॉलेजला त्यांचा देह दान करण्यात आला. ज्योती बसूंच्या अंत्यदर्शनासाठी मंगळवारी कोलकात्यात देश्- विदेशातून अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. त्याचबरोबर ग्रामीण भागातले कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. माकपच्या मुख्यालयात पक्षाचे सरचिटणीस प्रकाश करात, पॉलिट ब्युरोचे सदस्य असलेले पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य आणि त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार यांनी बसूंना आदरांजली वाहिली.

close