ढोल ताशांच्या गजरात पाचही मानाच्या गणपतींची मिरवणूक सुरू

September 27, 2015 12:38 PM0 commentsViews:

vlcsnap-2015-09-27-11h56m55s24427 सप्टेंबर : पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि याच पुण्यात लोकमान्य गंगाधर टिळक यांनी गणेशोत्सवाला सुरूवात केली. आज पुण्यात मोठ्या भक्तीमय वातावरणात ढोल ताशांच्या गजरात मानाच्या गणपतींच्या मिरुणुकींना सुरुवात झाली आहे. पुणेरी ढोल-लेझीम पथक आणि तरुणाईचा उत्साहात मानाच्या गणपतींचे विसर्जन केलं जातं. पारंपरिक आणि शिस्तबद्ध मिरवणुका हे पुण्याच्या मिरवणुकांचं खास वैशिष्ट्य आहे. पुण्याच सर्वत्र ढोल, ताशांचा आवाज घुमत असून, त्याला तरुणाईचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

दरम्यान, विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात सुरक्षेची चोख व्यवस्था ठेवण्य़ात आली आहे. पुण्यातल्या कसबा पेठेतील मानाचा गणपती विसर्जन मिरवणूकीत पुण्याचे पाकमंत्री गिरीष बापट यांनी या मिरवणुकीमध्ये सहभाग नोंदवला. समाधान चौकातून तांबडी जोग्श्वरी गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात झाली, तर गुरुजी तामील मानाचा तिसरा गणपती थोड्याचवेळात येण्याची शक्यता आहे.

पुण्यातील गणेश भक्तांनी काढल्या रांगोळ्या, रांगोळीच्या माध्यामातून दिला पर्यावरण वाचवण्याचा सामाजिक संदेश. चौकाचौकात भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळत आहे, तर ढोलताशांच्या गजरात भाविक लाडक्या बाप्पाला निरोप देताना दिसत आहे. यंदा मानाच्या पाच गणपतींच हौदात विसर्जन करण्याचा ऐतिहासिक निर्णय गणेश मंडळांनी घेतलाय. त्यांच्या या निर्णयाचं अनुकरण इतरही मंडळांनी सूरू केलंय़. दगडूशेठ गणपतीचं यंदा हौदामध्येच विसर्जन करण्यात येणार आहे. पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांनी हा निर्णय घेतलाय.

पुण्यातल्या गणपती विसर्जनासाठी प्रशासनही सज्ज आहेत. त्यासाठी विविध निर्बंध घालण्यात आले आहेत.विसर्जन मिरवणुकीसाठी शहरातल्या वाहतूकीत मोठे बदल करण्यात आले असून खडकवासला धरणातून अतिरिक्त पाणी सोडण्यात येणार. यंदाही मिरवणूक वेळेत संपवण्याचं आव्हाण पुणे पोलिसांसमोर असेल.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close