कोल्हापुरातल्या मिरवणुकीत ‘म्हाळसा’ आणि ‘खंडोबा’ची हजेरी

September 27, 2015 2:47 PM0 commentsViews:

êÖêËÖêîßÖêÖîy27 सप्टेंबर : कोल्हापुरातील मानाच्या तुकाराम माळी गणेश मंडळाच्या शाही मिरवणुकीस सुरूवात झाली आहे.यंदा सगळीकडे गाजत असलेल्या जय मल्हार मालिकेचा प्रभाव या मिरवणुकीतही दिसून येत आहे.

राज्याचे सहकारमंत्री व कोल्हापूर जिल्हय़ाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सकाळी नऊ वाजता आरती झाल्यानंतर तुकाराम माळी मंडळाच्या गणपतीची शाही मिरवणूक सुरू झाली. ढोलताशांच्या गजरात पारंपरिक वेशभुषेतील कोल्हापूरकर नागरिक मोठया संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले आहेत. या मिरवणुकीवर रजय मल्हारर मालिकेचा प्रभाव दिसून येत आहे. ‘खंडोबा’,  ‘म्हाळसा’ आणि ‘बानू’च्या वेशभुषेतील भाविकांमुळे ही मिरवणूक कोल्हापुरात वैशिष्टय़पूर्ण ठरली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close