भारतमाता थिएटर आहे तिथंच राहणार

January 19, 2010 10:16 AM0 commentsViews: 13

19 जानेवारी मुंबईतलं भारतमाता थिएटर आहे त्याच जागी राहील, त्यासाठी आवश्यक ते प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही केंद्रीय वस्त्रोद्यागमंत्री दयानिधी मारन यांनी दिली आहे. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह मारन यांनी भारतमाता थिएटरला भेट दिली. थिएटरचे मालक कपिल भोपटकर यांच्याशीही त्यांनी चर्चा केली. नगर नियोजनाप्रमाणे ही जागा मराठी थिएटरसाठीच राखीव ठेवण्याची सूचना यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी केली आहे. करार संपल्यामुळे एनटीसीने ही जागा रिकामी करण्यासाठी थिएटरचे मालक कपिल भोपटकर यांना नोटीस दिली आहे. या जागेवर मराठी थिएटरच बांधलं जावं यासाठी आंदोलन झालं होतं. आता एनटीसीने भास्कर ग्रुपला जागा विकसित करण्यासाठी दिली आहे.

close