रत्नागिरीत रस्त्यावर विषारी केमिकल सोडलं

January 19, 2010 10:19 AM0 commentsViews: 1

19 जानेवारी रत्नागिरीतल्या लोटे एमआयडीसीतल्या केमिकल कंपन्यांमधून केल्या जाणार्‍या प्रदूषणाला अजूनही आळा बसलेला नाही. खेडच्या बोरज धरणात केमिकल सोडून पाणी दूषित करणार्‍या कंपनीचा ठावठिकाणा अद्याप लागलेला नसतानाच एमआयडीसीतल्या रस्त्यांवर पुन्हा एकदा एका कंपनीने अतिजहाल केमिकल सोडलं आहे. याबाबत प्रदूषण मंडळ काहीच कारवाई करत नसल्याच्या निषेधार्थ मनसेच्या कार्यकर्त्यांनी प्रदूषण मंडळाच्या अधिकार्‍यांना घेराव घातला. तर पोलिसांनी हा सगळा प्रकार दडपण्याचा प्रयत्न केल्याने मनसेचे कार्यकर्ते आणखीनच संतप्त झाले. बोरज धरणाच्या पाणी प्रदूषणानंतर लोटेतल्या केमिकल कंपन्यांवर कारवाई सुरू झाली असून आतापर्यंत 20 कंपन्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

close