सतीश शेट्टी यांच्या हत्येची सीबीआय चौकशी करा – एकनाथ खडसे

January 19, 2010 10:21 AM0 commentsViews: 1

19 जानेवारी दिवंगत सामाजिक कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्येची सीबीआय चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केली आहे. त्याचप्रमाणे शेट्टींसारख्या कार्यकर्त्यांना सरकारने संरक्षण द्यावं, अशी मागणीही त्यांनी केली आहे. खडसेंनी मंगळवारी शेट्टींच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं. त्यावेळी आपण शेट्टींनी उपस्थित केलेल्या सर्व प्रकरणांचा पाठपुरावा करणार असल्याचंही ते म्हणाले. माहितीचा अधिकार वापरून भ्रष्टाचारविरोधात लढा देणार्‍या शेट्टी यांची तळेगाव इथं हत्या करण्यात आली होती.

close