औरंगाबादेत विसर्जन मिरवणुकीचा उत्साह शिगेला

September 27, 2015 7:13 PM0 commentsViews:

aur_bappa27 सप्टेंबर :  मराठवाड्याच्या राजधानी औरंगाबादमध्येही गणपती बाप्पांना मोठ्या भक्तीभावानं निरोप दिला जातोय. संध्याकाळी शहरभरात मोठ्या जल्लोषमय वातावरणात बाप्पांना निरोप दिला जातोय. दुपारनंतर घरगुती गणपतींच्या विसर्जनाला सुरुवात झालीये. शहरातील मध्यवर्ती भागात जिल्हा परिषदेच्या मैदानावरील विहिरीत विसर्जनाची सोय कऱण्यात आलीये.

मोठ्या सार्वजनिक गणेशाच्या विसर्जनाची सुरुवात सायंकाळी पाच वाजेच्यानंतर सुरू झालीये. शहराच्या आसपास असलेले पाण्याचे साठे कोरडे झाल्यामुळे जिल्हा परिषदेच्या मैदानावरील विहिरीत पाणी टाकून विसर्जनाची सोय झाल्यानं मोठ्या प्रमाणात गणेशाचं विसर्जन या ठिकाणी केलं जातेय.

औरंगाबादेत खर्‍या अर्थानं सायंकाळी सहाच्या नंतरच विसर्जनाला सुरुवात झालीये. गणपतींचं जिल्हा परिषद, मुकुंदवाडी, रेल्वेस्टेशन परिसरात विसर्जन करण्यात येत आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close