वेगळ्या विदर्भासाठी गरज पडल्यास नक्षलवाद्यांची मदत घेऊ – जांबुवंतराव धोटे

January 19, 2010 12:22 PM0 commentsViews: 38

19 जानेवारीगरज पडल्यास वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनात नक्षलवाद्यांची मदत घेऊ, अशी वादग्रस्त घोषणा माजी खासदार जांबुवंतराव धोटे यांनी केली आहे. नक्षलवादीसुद्धा माणसंच आहेत. त्यांचा लढा लोकांच्या हक्कांसाठी आहे. त्यामुळे त्यांची मदत घेण्यात काहीच गैर नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांचं 'एक भाषा, एक राज्य' हे सूत्र म्हणजे त्यांचा दुराग्रह असल्याचं धोटे म्हणाले. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी बुधवारी विदर्भ बंदचं आवाहन करण्यात आलं आहे. त्या पार्श्वभूमीवर या घोषणेमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

close