सनातनला पोटशूळ, हौदात विसर्जनाविरोधात केली पोस्टरबाजी

September 27, 2015 9:44 PM0 commentsViews:

27 सप्टेंबर : राज्यात दुष्काळाची परिस्थिती आणि पाणीटंचाईमुळे पुण्यात गणेश विसर्जन हे हौदात करण्याचा निर्णय घेण्यात आला. पाचही मानच्या गणपतींचं विसर्जन कृत्रिम हौदात करण्यात आलंय. या निर्णयाचं सर्व स्तरातून स्वागत होतंय. पण, त्याला सनातन संस्था अपवाद ठरलीये. गणपतीचं विसर्जन नदीतच करा असं सांगत सनातनच्या कार्यकर्त्यांनी पोस्टरबाजी केली.

pune sanatanआज पुण्यात विसर्जनाच्या दरम्यान, सनातनच्या कार्यकर्त्यांनी पोस्टरबाजी करून पुणेकरांना रोखण्याचा प्रयत्न केला. धर्मशास्त्र परंपरेप्रमाणे आणि आध्यात्यशास्त्रानुसार गणपतीचं विसर्जन हे वाहत्या पाण्यातच करा असा सूरच कार्यकर्ते लावत आहे. राज्यात दुष्काळाची परिस्थिती आहे. शेतकरी आत्महत्या करत आहे. नदीचंही प्रदूषण होऊ नये अशी सगळ्यांची भूमिका आहे तरी तुम्ही हा आग्रह का करत आहात असा सवाल कार्यकर्त्यांना विचारला असता. शास्त्रानुसार नदीतचं गणेश मूर्तीचं विसर्जन करा असा हट्ट सनातनचे कार्यकर्ते करत होते. एवढंच नाहीतर नदीचं प्रदूषण रोखण्याचं काम हे प्रशासनाचं आहे आम्हीही निवेदनं दिली असा अजब दावाही या कार्यकर्त्यांनी केला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close