आयपीएलच्या तिसर्‍या हंगामासाठी 11 क्रिकेटपटूंचा लिलाव

January 19, 2010 1:01 PM0 commentsViews: 2

19 जानेवारी आयपीएलच्या तिसर्‍या हंगामासाठी मुंबईत खेळाडूंचा लिलाव पार पडला. यात एकूण 11 खेळाडूंवर बोली लागली. आयपीएलच्या तिसर्‍या हंगामात पाकिस्तानच्या खेळाडूंबद्दल सर्वांना उत्सुकता होती. मात्र एकाही टीमने पाक खेळाडूंवर बोली लावली नाही. या लिलावात त्रिनिदाद अँड टोबॅगोचा कायरन पोलार्ड आणि न्यूझीलंडच्या शेन बॉण्डवर सर्वाधिक बोली लागली. पहिल्या फेरीत पोलार्डसाठी चार टीममध्ये टाय झाली. पण अखेर मुंबई इंडियन्सने 3 कोटी 41 लाख रुपयांची सर्वाधिक बोली लावत पोलार्डला विकत घेतलं तर नाईट रायडर्सने शेन बॉण्डसाठी तितकीच किंमत मोजली. 19 वर्षांखालील खेळाडूंमध्ये हरमीत सिंग, हर्षल पटेल आणि अशोक मनेरिया या तीन खेळाडूंवर बोली लागली. हरमीतला डेक्कन चार्जर्सने, हर्षल पटेलला मुंबई इंडियन्सने तर अशोक मनेरियाला बंगलोर रॉयल चॅलेंजर्सने विकत घेतलं.

close