पुण्यात पाचही मानाच्या गणपतींचं विसर्जन

September 27, 2015 11:30 PM0 commentsViews:

27 सप्टेंबर : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुण्यामध्ये पाचही मानाच्या गणपतींचं ढोल ताशांच्या गजरात, ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ जयघोषात विसर्जन करण्यात आलंय. उत्साहात आणि पांरपरिक पद्धतीनं हे विसर्जन झालं.

pune pachahi ganmanti

मात्र या पाचही गणपतींच्या विसर्जनानं एक आदर्श निर्माण केलाय. या पाचही मानाच्या गणपतींचं हौदात विसर्जन केले गेलं. पहिला मानाचा कसबा पेठ, तांबडी जोगेश्वरी, गुरूजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा या पाचही मानाच्या गणपतींना पुणेकरांनी निरोप दिलाय.. या पाचही गणपती मंडळानं पर्यावरणपूरक विसर्जन करून इतर गणेश मंडळांसमोर आपल्या कृतीतून आवाहन केलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close