पुण्यात सौरभ हॉलमधील क्रॉसवर्डमध्ये आग

September 28, 2015 8:26 AM0 commentsViews:

PUNE CROSSWORD FIRE

28 सप्टेंबर : पुण्यातल्या सौरभ हॉलमधील क्रॉसवर्डमध्ये काल (रविवारी) लागलेली आग पुन्हा भडकली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अजून काही तास लागणार असल्याची माहिती अग्निशमन दलानं दिली आहे. दरम्यान या आगीत क्रॉसवर्डमधील हजारो पुस्तकं जळून खाक झाली आहेत.

काल रात्री लागलेली ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान गेल्या 10 तासांपासून शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मात्र, आता पुन्हा आग भडकली आहे. आगीवर नियंत्रण मिळवणं आणखी कठीण झाले आहे.

आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घेटनास्थळी दाखल झालेत. आतापर्यंत 2 जणांना वाचवण्याच आलं असून आणखी 3-4 जणांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close