पुण्यात सिंबॉयसिस कॉलेजच्या 110 विद्यार्थ्यांना विषबाधा

January 20, 2010 11:13 AM0 commentsViews: 1

20 जानेवारी पुण्याच्या हिंजवडी इथल्या सिंबॉयसिस मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना जवळपास 110 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाली आहे. हॉस्टेलच्या मेस मधील खाण्यातून ही विषबाधा झाली आहे. यापैकी 44 जणांना बिर्ला हॉस्पिटलमध्ये तर 42 जणांना मेडीपाईंट या हॉस्पिटमध्ये दाखल करण्यात आलं आहे. कोणाचीही प्रकृती गंभीर नसल्याची माहिती सिंबॉयसिसचे हेल्थ डायरेक्टर राजीव येरवडेकर आणि बिर्ला हॉस्पीटलच्या डॉक्टरांनी घेतलेल्या पत्रकार परिषेदत दिला आहे. जवळपास 1200 विद्यार्थ्यांच्या जेवणाची जबाबदारी हिंजेवडीतल्या तमन्ना हॉटेलच्या कॅटररकडे आहे.

close