तब्बल 20 तासांनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन

September 28, 2015 12:33 PM0 commentsViews:

28 सप्टेंबर : राज्यात बहुतांश ठिकाणी बाप्पाला काल (रविवारी) भावपूर्ण निरोप देण्यात आला. मुंबईतल्या भाविकांच्या आकर्षणाचं केंद्र असलेला लालबागच्या राजाचं आज(सोमवारी) सकाळी पाऊणे नऊच्या सुमाराला विसर्जन झालं. कोळी बांधवांनी राजाचं विसर्जन केलं. तब्बल 20 तासांहून जास्त वेळ लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरू होती. त्यानंतर गिरगाव चौपाटीवर लाडक्या बाप्पाला निरोप दिला गेला. तर पुण्यात सकाळी दगडूशेठ हलवाई गणपतीचं विसर्जन झालं. सर्व मानाच्या गणपतीचं कालच विसर्जन झालंय. उरलेल्या गणपतींचं विसर्जन सुरू आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close