भारताचे पहिले अॅस्ट्रोसॅट सॅटेलाईट अवकाशात झेपावले

September 28, 2015 11:16 AM0 commentsViews:

sadfsarfearae

28 सप्टेंबर : मंगळ अभियान यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर आता भारताने अंतराळ क्षेत्रात आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे. भारताचे आज पहिले पीएसएलव्ही सी-30 अॅस्ट्रोसॅट सॅटेलाईट अवकाशात झेपावलं आहे. अशा प्रकारचे उपग्रह अवकाशात सोडणारा भारत जगातील चौथ्या नंबरचा देश बनला आहे.

हे उपकरण श्रीहरिकोटा येथून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या सतीश धवन स्पेश सेंटर इथून हे अवकाशात सोडण्यात आलं. या आधी अशा प्रकरचं उपग्रह अमेरिका, रशिया आणि जपान या देशांनी सोडलं आहे. पीएसएलव्ही सी-30 मधून इंडोनेशिया, लापान ए-2 हा मायक्रो सॅटेलाईट, कॅनडाचा एनएलएस 14 नॅनो सॅटेलाईट आणि अमेरिकेचे लेमुर हे चार सॅटेलाईटही प्रेक्षेपित करण्यात आले. पीएसएलव्ही सी-30 चे वजन 302.20 टन एवढं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close