लालबाग राजाच्या दरबारात पोलिसांची तरूणीला मारहाण

September 28, 2015 1:45 PM3 commentsViews:

28 सप्टेंबर : लालबागच्या राजाच्या दरबारात पुन्हा एकदा भक्ताला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. पण आता ही मारहाण राजाच्या स्वयंसेवकांनी नाही, तर पोलिसांनीच केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एक महिला लालबागच्या दर्शनासाठी आली होती. त्यावेळी तिने व्हीआयपी गेटमधून आत लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी घुसण्याचा प्रयत्न केला तसंच पोलिसांसोबत गैरवर्तन केलं. यानंतर या महिलेला पोलिसांकडून बेदम मारहाण करण्यात आली. ही महिला मिराज रोड येथील रहिवाशी आहे. या महिलेकडून 1200 दंड घेऊन नंतर तिला सोडण्यात आलं आहे.

ËáÖÖêê»ÖÖ¸üÛúß

मात्र सामान्यांचे रक्षणकर्तेच असे गुंडासारखे वागू लागले तर मग सामान्य नागरिकाने कोणाकडे आपली तक्रार करायची हा देखील एक मोठा प्रश्न आहे. महिला कॉन्सटेबलने या महिलेला मारहाण केलेला व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. आत्तापर्यंत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाहीये. तर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही महिला मानसीक रित्या आजारी असल्याचं समजतंय.

दरम्यान, या घटनेला सरकारने गंभीरतेने घेतले आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत. तसंच या प्रकरणी अहवाल आल्यानंतर महिला पोलीस दोषी असतील तर कडक कारवाई केली जाईल असं राज्याचे गृहराज्य मंत्री राम शिंदे यांनी सांगितलं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Ajay A Lingayat

    मनापासून नमस्कार केला तर मनातला गणपती पण पावतो …!

  • Ajay A Lingayat

    देवदर्शना साठी VIP रांग वेगळी का ???

  • uday

    maz asto policana

close