वेगळ्या विदर्भासाठी नक्षलवाद्यांची मदत घेऊ – प्रकाश आंबेडकर

January 20, 2010 11:16 AM0 commentsViews: 23

20 जानेवारीनक्षलवादी जर लोकशाही मार्गाने स्वतंत्र विदर्भ आंदोलनात उतरत असतील तर आम्ही त्यांची निश्चित मदत घेऊ असं भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी नागपूर इथे म्हटलंय. मंगळवारी माजी खासदार जांबूवंतराव धोटे यांनीही चंद्रपूरात अश्याच प्रकारच विधान केलं होतं. त्यापाठोपाठ बुधवारी प्रकाश आंबेडकर यांनी विदर्भ बंद असताना हे विधान केलं आहे. मात्र धोटेंच्या विधानाशी स्वतंत्र विदर्भ संग्राम समिती सहमत नसल्याचं काँग्रेसचे खासदार विलास मुत्तेमवार यांनी मंगळवारीच स्पष्ट केलं होतं.

close