नवी मुंबईत 94 अनधिकृत इमारतींवर पडणार हातोडा

September 28, 2015 7:47 PM0 commentsViews:

navi mumbai bulding28 सप्टेंबर : नवी मुंबईतल्या दिघा परिसरात अतिक्रमणाचं जाळं पसरलंय. ठाणे पनवेल रस्त्या लगत मोक्याच्या जागेवर भूमाफियांनी या अनधिकृत इमारती उभारल्यात. एकूण 94 अनधिकृत इमारती उभारण्यात आल्या असून यावर लवकरच हातोडा पडणार आहे.

12 ते 15 लाख रूपयांमध्ये ही घरे मिळत असल्याने गरजवंत माणूस सहजरित्या या भूमाफियांच्या गळाला लागत होते. यामुळे मागिल 5 ते 6 वर्षांत या इमारती उभारल्या गेल्यात.

नवी मुंबईतील दिघा परिसरातील 94 अनधिकृत इमारती जमिनदोस्त करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. या आठवड्यामध्ये या इमारतींवर हातोडा पडणार आहे.

एमआयडीसी, सिडको आणि नवी मुंबई महापालिकेच्या संयुक्तरित्या मोहीम राबवली जाणार आहे. या कारवाईमुळे शेकडो कुटुंब बेघर होणार आहेत. तर दुसरीकडे, या इमारती ज्यांनी बांधल्या ते बिल्डर, आणि त्यांना आशीर्वाद देणारे परिसरातले तिन्ही नगरसेवक यांच्यावरही कडक कारवाई करा, अशी मागणी याचिकाकर्ते राजीव मिश्रा यांनी केलीये.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close