अबू आझमी यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

January 20, 2010 11:21 AM0 commentsViews: 2

20 जानेवारी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्याविरुध्द आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिवंडी पूर्व मतदारसंघात बुधवारी पोटनिवडणुक होत आहे. मनाई असूनही मतदानकाळात मतदारंसघात फिरल्याने आझमींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आझमींना मतदारसंघाबाहेर जाण्याची नोटीस सकाळीच निवडणुक आयोगाने दिली होती. अबू आझमी हे शिवाजीनगर मानखुर्द आणि भिवंडी या दोन्ही मतदारसंघातून निवडून आल्याने त्यांनी भिवंडीच्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्या जागेसाठी ही निवडणूक होत आहे.

close