पंतप्रधान मोदींनी घेतली ओबामांची भेट

September 28, 2015 11:06 PM0 commentsViews:

modi obama meat28 सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही देशांमध्ये संबंध दृढ करण्याबाबत चर्चा झाली. मोदी आणि ओबामा यांच्यात वर्षभरातली ही तिसरी भेट आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौर्‍याची आज सांगता होतेय. मोदींनी आज वेगवेगळ्या राष्ट्रप्रमुखांच्या गाठीभेटी घेतलाय. इंग्लंडचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरून आणि फ्रान्सचे अध्यक्ष फ्राँस्वा ओलांद यांचीही भेट घेतली. या भेटीत द्विपक्षीय संबंधांवर चर्चा झालीय. मोदी आणि होलांद यांच्या भेटीच्या वेळी मायक्रोसॉफ्टचे को फाऊंडर बिल गेट्सही उपस्थित होते.

त्यानंतर मोदींनी बराक ओबामा यांचीही भेट घेतली. हे दोन्ही नेते या वर्षी तिसर्‍यांदा भेटले. या भेटीतही तिची ऊर्जा जाणवली जी ओबामा यांच्या भारत भेटीदरम्यान जाणवली होती. मागील वर्षी मे महिन्या दोन्ही नेत्यांची भेट झाली होती. ओबामा भारताच्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. आजच्या या भेटीच्या निमित्ताने दोन्ही देशातील चर्चा पुढे नेण्याची संधी मिळालीये.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close