विदर्भ बंदचे सोलापूरात पडसाद

January 20, 2010 1:52 PM0 commentsViews: 1

20 जानेवारी सोलापूरमध्ये शिवसेनेने विदर्भ बंद च्या विरोधात विदर्भवाद्यांच्या पुतळ्याला चप्पल मारो आंदोलन केलं. या आंदोलनकर्त्यांनी वेगळ्या विदर्भाच्या मागणीचा निषेध केला. यावेळी शिवसैनिकांनी विदर्भवाद्यांचा पुतळाही जाळला. सोलापुरातल्या मेकॅनिक चौकात हे आंदोलन केलं. शिवाजी महाराजांचा अखंड महाराष्ट्र फोडण्याचा जो प्रयत्न करेल त्याला शिवसेना वठणीवर आणेल असा इशाराही यावेळी शिवसैनिकांनी दिला.

close