केडीएमसीच्या आखाड्यात सेना-भाजप युतीचे संकेत

September 29, 2015 10:15 AM0 commentsViews:

sena bjp kdmc29 सप्टेंबर : कोल्हापूर आणि कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकांचे बिगुल आता वाजले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपने मोर्चेबांधणीसाठी सुरुवात केलीये. शिवसेना नेते अनिल देसाई आणि सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमुळे युतीचे संकेत देसाई यांनी दिलेत.

शिवसेना भाजपसोबत युतीसाठी तयार असल्याचंही देसाई यांनी स्पष्ट केलं. शिवसेना पदाधिकारी आणि नगरसेवकांसमोर अडचणी निर्माण होतायत अशी तक्रारही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. विशेष म्हणजे, निवडणूक तारखा जाहीर करताना आयोगाने कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातल्या त्या 27 गावांनाही मतदान प्रक्रियेत सामिल करून घेतलंय. त्यामुळे शिवसेनेला मोठा दिलासा मिळालाय. मुख्यमंत्र्यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर ही 27 गावं पालिकेमधून वगळली होती. पण आयोगाने आपल्या निर्णयावर ठाम राहत त्या 27 गावांमध्ये मतदान होणारच अशी भूमिका जाहीर केलीय. कोल्हापूर आणि केडीएमसीत 1 नोव्हेंबरला मतदान तर 2 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.

कल्याण-डोंबिवलीचा आखाडा
एकूण जागा : 122 (107)

शिवसेना – 31
भाजप – 9
काँग्रेस – 15
राष्ट्रवादी – 14
मनसे – 27
अपक्ष – 11

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close