INS कोची युद्धनौका उद्या नौदलात होणार दाखल

September 29, 2015 11:46 AM0 commentsViews:

ins kochi29 सप्टेंबर : मुंबईवर झालेल्या 26/11 हल्ल्यानंतर देशाचा पश्चिम समुद्रकिनारा अधिक सुरक्षित करण्यासाठी नौदलाने मोठं पाऊल उचललंय. कोलकता श्रेणीची युद्धनौका आएनएस कोची उद्या (बुधवारी) नौदलात दाखल होणार आहे. आएनएस कोचीच्या स्वागतासाठी नौदल सज्ज झालंय. संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या हस्ते मुंबईतील नौदल गोदीत देशाच्या सेवेत दाखल होणार आहे.

मुंबईत नौदलाच्या माझगाव गोदीत तीची बांधणी करण्यात आलीय. आएनएस दिल्ली क्लास नंतर आएनएस कोलकाता क्लास मधील ही दुसरी महत्वाची युद्धनौका आहे. ही युद्धनौका स्टेल्थ प्रकारतील म्हणजे शत्रूच्या रडारवर न दिसणारी आहे. त्यामुळे युद्धात ही युद्धनौका निर्णायक भूमिका करू शकते. तसंच या युद्धनौकेवर 16 ब्रम्होस क्षेपणास्त्र तैनात आहेत. जे 250 ते 300 किलोमीटर अंतरापर्यंत लक्ष अचूकपणे उद्धवस्त करू शकतात. त्यापूर्वी आज हायस्पीड असलेल्या तीन युद्धनौका नौदलात दाखल झालंय. यात आत्याधुनिक संदेश यंत्रणा, मशिनगन आणि इतर सुविधा असल्याने या युद्धनौकेमुळे समुद्रकिनार्‍यांची सुरक्षा मजबूत होणार आहे.

आयएनएस कोचीची वैशिष्ट्ये
- 164 मीटर लांबी, 17 मीटर रुंद
- 7500 टन वजन, 30 किमी प्रतिवेग
- युद्धनौकेत मिसाईल
- पूर्णपणे स्वदेशी बनावट
- शत्रूंच्या रडारला चुकवण्याची क्षमता
- 30 अधिकार्‍यांसह 350 जवान तैनात करण्याची क्षमता
- महिला अधिकार्‍यांचाही सहभाग
- युद्धनौकेत सिकिंग आणि चेतकसारखे हेलिकॉप्टर

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close