गोल्डमोहर मिलला मोठी आग

January 20, 2010 1:54 PM0 commentsViews: 2

20 जानेवारीदादरमधील गोल्डमोहर मिलला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे. तब्बल चार तासांच्या प्रयत्नानंतर ही आग विझवण्यात आली. फायर ब्रिगेडच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आग विझवण्याचे प्रयत्न सुरू झाले. गोल्डमोहर मिलच्या आजूबाजूला रहिवाश्यांची दाट वस्ती आहे. ही आग पसरु नये याकरता फायर ब्रिगेडने प्रयत्न केले. त्यामुळे जीवितहानी टळली. यात नक्की किती नुकसान झालं याबाबतची माहिती अद्याप उपलब्ध होऊ शकलेली नाही.

close