सेंट्रल बँकेचा पराक्रम, पिक विम्याऐवजी काढला आरोग्य विमा !

September 29, 2015 11:57 AM0 commentsViews:

wardha central bank29 सप्टेंबर : सध्या महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालीये आणि शेतकरी कर्जबाजारीपणामुळे हैराण झालांय. त्यातच वर्ध्यातील पवनारमध्ये सेंट्रल बँकेने शेतकर्‍याची फसवणूक केल्याचं समोर आलंय. पिक विमा ऐवजी आरोग्य विमाचा काढल्याचा पराक्रम सेंट्रल बँकेनं गाजवलाय.

त्याचं झालं असं की, सेंट्रल बँकेने पिकाचं संरक्षण करणारा पिक विमा काढला असल्याचं शेतकर्‍यांना सांगितलं. मात्र, पिक विमा ऐवजी शेतकर्‍यांचा आरोग्या विमा काढला गेलांय असं आता समोर येतंय. या सगळ्यात शेतकर्‍यांना मात्र विश्वासात न घेता सेंट्रल बँकेने चक्क चोला मंडलम या खासगी कंपनीशी हातमिळवणी करून पिकाचा विमा काढण्याऐवजी आरोग्याचा विमा काढल्याची बाब पुढे आली आहे.
पिकाचे संरक्षण व्हावे यासाठी हवामान पिक विमा काढण्यासाठी शेतकर्‍यांनी बँकेला विनंती केली होती. पण सेंट्रल बँक तारीख निघून गेल्याने शेतकर्‍यांचा आरोग्य विमा काढला असे बँक व्यवस्थापकांचे म्हणणे आहे. आरोग्य विम्याची 611 रुपयाची रक्कम क्रोप
लोन खात्यातून परस्पर कमी झाली आहे. आधीच शेतकर्‍यांच्या आत्महत्या आणि त्यावर बँकाही अशाप्रकारची कामे करून शेतकर्‍यांना वेठीस धरीत आहेत. पंतप्रधान विमा योजनेच्या विम्यात या बँकांना रस नाही तर चोला मंडलम सारख्या कंपन्यांच्या विम्यात या बँका एवढा रस का घेतात हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close