रेपो रेटमध्ये कपात ; गृह, वाहन कर्ज होणार स्वस्त

September 29, 2015 12:21 PM0 commentsViews:

rbi repo429 सप्टेंबर : रिझर्व बँकेनं जनतेला आणि एकूणच अर्थव्यवस्थेला आनंदाची बातमी दिली आहे. रेपो रेटमध्ये अर्ध्या टक्क्याची कपात करण्यात आली आहे. रेपो रेट 7.25 वरून 6.75 टक्क्यांवर आणण्यात आलाय. रिझर्व बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी ही घोषणा केलीय. या घोषणेमुळे आता गृहकर्जंही स्वस्त होतील, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

रिझर्व बँक ऑफ इंडियाने याच वर्षी आरबीआयनं एकूण 0.75 टक्के कपात केली आहे. पण ती वर्षाच्या सुरुवातीला होती..त्यानंतर कपात झालेली नाही. अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यासाठी रेपो रेटमध्ये कपात केली जाईल, शक्यता होती. आणि रघुराम राजन यांनी ती पूर्ण करून दाखवली. रेपो रेट 7.25 वरून 6.75 टक्क्यांवर आणण्यात आलंय. यामुळे आता बँकांकडून कंपन्यांना मिळणार्‍या कर्जाचे व्याजदर कमी होतील. घर खरेदी करणार्‍यांनाही याचा फायदा होईल. आता यामुळे अर्थव्यवस्थेला चालना देण्यात मदत मिळेल, अशी अपेक्षा अनेक उद्योगपती आणि तज्ज्ञ करतायत. रेपो रेट कमी केल्यामुळे बाजारातला पतपुरवठा वाढणार आहे. आपल्या कंपनीचा विस्तार करण्यासाठी उद्योगपतींनी कर्जाची गरज पडते. आणि कर्जाच्या या व्याजदरांमध्ये आता बँका कपात करतील, अशी अपेक्षा आहे.

रेपो रेट म्हणजे काय ?
– ज्या व्याजदरानं रिझर्व बँक इतर बँकांना कर्ज देते, त्या दराला रेपो रेट असं म्हणतात
– महागाई आटोक्यात ठेवण्यासाठी रिझर्व बँक रेपो रेट कमी-जास्त करत असते
– महागाई वाढली तर रेपो रेट वाढवला जातो
– यामुळे बाजारातला पतपुरवठा कमी होतो, आणि महागाई कमी होण्यास मदत होते
– दर 2 महिन्यांनी रेपो रेटचा आढावा घेतला जातो

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close