रिपब्लिकन, स्वाभिमानीसह राज्यातील 16 पक्षांची मान्यता होणार रद्द?

September 29, 2015 4:03 PM0 commentsViews:

shetty and athawale

29 सप्टेंबर : आयकर विवरणपत्र सादर न केल्यानं 16 राजकीय पक्षांची मान्यता रद्द होण्याची शक्यता आहे. धक्कादायक म्हणजे, या पक्षांमध्ये रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियासह खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाचाही समावेश आहे. इतकंच नाही, तर आमदार कपिल पाटील यांचा लोकभारती पक्ष आणि माजी मंत्री विनय कोरे यांचा जनसुराज्य पक्षाचाही या यादीत समावेश आहे.

निवडणुकीच्या काळात मिळालेल्या देणग्या आणि इतर खर्च याचा तपशील निवडणूक आयोगाला देण बंधनकारक आहे. पण या राजकीय पक्षांनी अद्याप तपशील दिलेलं नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाने आक्रमक पवित्रा घेत, राजकीय पक्षांना नोटिसा धाडल्या आहेत. या नोटीसला राजकीय पक्षांनी दिलेलं उत्तर समाधानकार नाही. त्यामुळे निवडणूक आयोग 16 राजकीय पक्षांची मान्यता रद्द करण्याच्या तयारीत आहे.

दरम्यान, या निर्णयामुळे या पक्षांना एकत्रित निवडणूक चिन्ह मिळणार नाही, असे राज्य निवडणूक आयुक्त सहारिया यांनी सांगितले. निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरोधात राजकीय पक्षांना न्यायालयात धाव घ्यावी लागणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close