आयपीएल मॅचसाठी राज्यात टॅक्स भरावा लागणार

January 20, 2010 2:00 PM0 commentsViews: 1

20 जानेवारीआयपीएलमॅचना कर आकारण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. आयपीएलबरोबरच इतर टी-20 आणि वन-डे मॅचेसवर कर आकारण्यात येणार आहे. नफ्यात असणार्‍या IPL ला यापुढे मुंबईतल्या मॅचवर 25% कर भरावा लागणार आहे. तर इतर महानगरपालिकांमध्ये 30 टक्के कर भरावा लागणार आहे. तसंच महानगरपालिका व्यतिरिक्त असलेल्या भागामंध्ये 15 टक्के टॅक्स लावणार आहे. पॉप संगीत लावणार्‍या डिस्को आणि पब्जवरसुद्धा करमणूक टॅक्स लावण्यात आलाय. पण शास्त्रीय संगीत लावणार्‍या रेस्टॉरंटसना मात्र यातून सूट देण्यात आली आहे.

close