औरंगाबादेत रिक्षा चालकाची पोलिसांना मारहाण

September 29, 2015 4:29 PM1 commentViews:

aurangagdagp

29 सप्टेंबर : ‘नो पार्किंग’मध्ये रिक्षा काढण्याला सांगितल्याच्या कारणावरून रिक्शाचालक शेख गफारसह त्याच्या भावाने दोन पोलिसांना दगडाने मारहाण केली. त्यानंतर स्वत:च रिक्षा पेटवून दिली. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून, अन्य एका आरोपीचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

रेल्वे स्टेशन परिसरात रिक्शाचालक शेख गफार याने नो पार्किंगमध्ये आपली रिक्शा उभी होती. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी त्याला रिक्षा बाजुला घेण्याला सांगितलं. त्यावरून रिक्शा चालक शेख गफार आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर वाद विकोपाला गेला आणि रिक्षा चालकासह त्याच्या भावाने पोलिसांना दगडाने मारहाण केली. त्यात दोन पोलीस जखमी झाले. या दोघांना घाटी रूग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर रिक्षा चालकाने स्वत:ची रिक्षा पेटवून दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून, अन्य एकाचा शोध घेण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी अरेरावी केल्याचा आरोप रिक्षा चालकाच्या नातेवाईकांनी केली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • prasad gadkari

    I guess CM cant handle Nagpur only as Home minister of Maharashtra
    , How is going to handle whole Maharashtra, He better put some one else eligible person as a Home minister

close