तरुणीला मारहाणीप्रकरणी दोन महिला पोलीस निलंबित

September 29, 2015 5:58 PM0 commentsViews:

ËáÖÖêê»ÖÖ¸üÛúß

29 सप्टेंबर : मुंबईतल्या ‘लालबाग राजा’च्या दर्शनाला आलेल्या तरूणीला बेदम मारहाण केल्याप्रकरणी काँन्स्टेबल वर्षा पाटील , काँन्स्टेबल अनुराधा सोळूंके या दोन महिला पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे. रांग तोडून दर्शनासाठी जाणार्‍या तरुणीला बंदोबस्तासाठी उपस्थित असलेल्या महिला पोलिसांनी बेदम मारहाण केली होती. काल (सोमवारी) या मारहाणीचं सीसीटीव्ही फुटेज सोशल मिडियावर व्हायरल झालं. महिला पोलिसांच्या या ‘दबंगगिरी’वर सर्व स्तरांतून टीका होऊ लागली होती. तर, खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणाची दखल घेत चौकशीचे आदेश दिले होते. पोलीस उपायुक्तांनीही या प्रकरणाची दखल घेऊन दोन दिवसांत चौकशी पूर्ण करण्यास सांगितलं. त्यानंतर आज (मंगळवारी) याप्रकरणाशी संबंधित दोन महिला निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close