श्याम मानव सनातन संस्थेला बदनाम करतायेत – अभय वर्तक

September 29, 2015 9:52 PM0 commentsViews:

ABHAY VARTAK

29 सप्टेंबर : अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी केलेल्या आरोपांना सनातननं आज उत्तर दिलं. सनातन ही संस्था लोकांचं संमोहन करून ब्रेन वॉश करते आणि त्यातूनच कट्टर साधक तयार होतात असा आरोप केला होता. आयबीएन-लोकमतच्या बेधडक या कार्यक्रमात त्यांनी हा आरोप केला होता. त्यावर, संमोहनाच्या माध्यमातून कुणाकडूनही गैरकृत्य करून घेता येत नाही ही वस्तुस्थिती असताना श्याम मानव सनातन संस्थेला बदनाम करत असल्याचा आरोप संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी केला आहे.

श्याम मानव यांनी आमच्या साधकांकडून गैरकृत्ये करून दाखवावीत नाहीतर आमची लेखी माफी मागावी अशी मागणी वर्तक यांनी केली आहे. सनातन संस्थेच्या साधकांना संमोहीत करून त्यांच्याकडून गुन्हा घडवून घेतल्यानंतर त्यांचा ब्रेन वॉश करतात असा मानव यांचा आरोप असून ही सरळ सरळ संस्थेची बदनामी असल्याचं वर्तक म्हणाले.

श्याम मानव हे सनातन संस्थेमध्ये होते, त्यामुळे त्यांना आतली माहिती असल्याचं सांगण्यात येत असलं तरी यात काहीही तथ्य नाही. हिंदू धर्म मानत नसलेले मानव सनातनचे इनसायडर कसे असतील, असा सवाल वर्तक यांनी केला आहे. श्याम मानव हे स्वत: संमोहनाचे प्रशिक्षण देतात आणि ते यातले जाणकार मानले जातात. मात्र, त्यांनी सनातन संस्थेवर केलेल्या आरोपांमुळे संस्था त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करता येईल का याची चाचपणी करत आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close