टॅक्सी परमिटसाठी स्थानिक भाषा आवश्यक – मुख्यमंत्री

January 21, 2010 8:47 AM0 commentsViews: 2

21 जानेवारी स्थानिक भाषेत गुजराती, हिंदी या भाषाही येतात. पण त्याचा चुकीचा अर्थ लावत मराठी भाषाच आली पाहिजे यावर चर्चा झाली. असं घुमजाव मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केलं आहे. टॅक्सीचालकाला स्थानिक भाषेत, लिहिता, बोलता, वाचता आलं पाहिजे असा सरकारचा निर्णय होता. टॅक्सी परमिटसाठी मराठी भाषेची सक्ती करण्याचा निर्णय राज्य सरकारने बुधवारीच घेतला होता. पण अचानक राज्य सरकारने आपला धोरणात्मक निर्णय बदलला आहे. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केलेल्या घूमजावावर शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांनी लाचारी पत्करली आहे, अशा शब्दात टीका केली.

close