विरारमध्ये ज्वेलर्स दुकानावर धाडसी दरोडा, सराफावर गोळीबार

September 30, 2015 8:29 AM0 commentsViews:

virar daroda30 सप्टेंबर : विरारमध्ये दरोडेखोरांनी भर चौकातल्या महालक्ष्मी ज्वेलर्सवर दरोडा टाकला आणि सराफावर अंदाधुंद गोळीबार केल्याची घटना घडलीये. ज्वेलर्स मालकावर मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दरोडेखोरांना पकडण्यासाठी विशेष पथकं तयार केली आहेत.

मंगळवारी रात्री साडे आठच्या सुमाराला एक व्यक्ती विरार पूर्वेकडच्या साईनाथ नगरमधल्या महालक्ष्मी ज्वेलर्सच्या दुकानात शिरला. मग ज्वेलर्स मालक किशन सिंग खरवड यांनी त्याला सोन्याची साखळी दाखवली. त्या व्यक्तीनं साखळी घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. ज्वेलर्सचे मालक किशन सिंग खरवड यांनी चोराचा पाठलाग केला. तेवढ्यात त्या दरोडेखोरानं त्यांच्यावर पाच राउंड फायर केले. बाहेर उभ्या असलेल्या मोटारसाईकलवरून दरोडेखोर फरार झाले. भर चौकात हा दरोडा पडल्यानं खळबळ उडालीय. दुकानात सीसीटीव्ही असल्याने दरोडेखोराचे चिञ उपलब्ध झाले आहे. दरोडेखोराला लवकरात लवकर पकडण्यात येईल असं आश्वासन पोलिसांनी दिलंय. या प्रकरणी विशेष पथकं तयार करण्यात आलीये. पोलीस दरोडेखोरांचा शोध घेत आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close