भाजपचे कणकवलीचे आमदार प्रमोद जठार खून प्रकरणात सहआरोपी

January 21, 2010 8:53 AM0 commentsViews: 64

21 जानेवारी भाजप कणकवलीचे आमदार प्रमोद जठार यांना सिंधुदुर्ग पोलिसांनी एका खून प्रकरणात सहआरोपी केलं आहे. निवडणूक काळात जठार यांच्या प्रचारासाठी भांडूपहून सिंधुदुर्गात आलेल्या राजेश कदम या कार्यकर्त्याचा खून झाला होता. या प्रकरणात आत्तापर्यंत आठ आरोपींना अटकही करण्यात आली आहे. जठार यांनी याबाबत अटकपूर्व जामीनही घेतला आहे. मात्र कणकवली मतदारसंघातला आपला विजय सहन झाला नसल्याने राजकीय सूडबुध्दीने पोलिसांवर दबाव आणून आपल्याला गोवलं जात असल्याचं आरोप जठार यांनी केला आहे.

close