भाजपचा सेनेला बायपास, सेनेला वगळून बोलावली घटकपक्षांची बैठक

September 30, 2015 11:43 AM0 commentsViews:

danve on sena3430 सप्टेंबर : कल्याण डोंबिवली निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना आणि भाजपमध्ये धुसफूस सुरू झालीये. भाजपने सोईस्करपणे शिवसेनेला बाजूला सारलं. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी महायुती घटक पक्षांची तातडीची बैठक बोलवली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांचा मित्रपक्ष शिवसेनेला या बैठकीतून वगळण्यात आलं आहे.

वरळी येथील सुखदा निवासस्थानी दुपारी ही बैठक होणार आहे. या बैठकीत एफआरपी, महामंडळ, मंत्रिमंडळ विस्तार, आरक्षण यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. विशेष म्हणजे कल्याण डोंबिवली निवडणुकीसाठी भाजपने स्वतंत्र्यपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू झाली आहे. आणि त्यात आजच्या या बैठकीची भर पडलीये.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close