‘तो’ पेटत्या रिक्षात आपल्या मुलाला फेकत होता

September 30, 2015 2:16 PM0 commentsViews:

30 सप्टेंबर : औरंगाबादमध्ये पार्किंगच्या वादावरुन मंगळवारी पोलीस आणि रिक्षाचालकामध्ये बाचाबाची झाली होती. संतापलेल्या रिक्षाचालकाने स्वत:हाची रिक्षाच पेटवून दिली होती. हा रिक्षाचालक एवढ्यावरच थांबला नाहीतर त्याने आपल्या लहान मुलाला पेटत्या रिक्षात फेकण्याचा प्रयत्न केला. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झालाय.abad auto

औरंगाबादच्या रेल्वेस्टेशनबाहेर पोलीस आणि रिक्षाचालक शेख गफार यांच्यात वाद झाल्यानं संतापलेल्या शेख गफारनं रिक्षा पेटवली. पार्किंगमध्ये रिक्षा उभी करण्याच्या वादातून पोलीस आणि गफार यांच्यात वाद झाला होता. शेख गफ्फार हा पेटलेल्या रिक्षामध्ये स्वत:च्या मुलालाच फेकण्याचा प्रयत्न करत होता. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये कैद झालीये. मात्र पोलिसांनी मुलाला सुखरूप तिथून बाहेर काढलं. नंतर गफार याचा भाऊ त्याठिकाणी आला आणि त्यानं पोलिसांवर दगडफेक केली. या दगडफेकीत दोन पोलीस जखमी झालेत. या वादानंतर रेल्वे परिसरात तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी बंदोबस्त वाढवून परिस्थिती नियंत्रणात आणली. दोन्ही जखमी पोलिसांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल कऱण्यात आलं तर एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close