राज्य सरकारची हातसफाई ; 350 कोटींचा एलबीटी रद्द, विक्रीकरात वाढ !

September 30, 2015 4:14 PM1 commentViews:

mungantiwar_lbt30 सप्टेंबर : राज्य सरकारने तिजोरीवरचा भार हलका करण्यासाठी 350 कोटींचा एलबीटी रद्द केलाय. पेट्रोल आणि डिझेलवर राज्यात लागू असलेल्या एलबीटी रद्द करण्यात आलाय. एकीकडे एलबीटी रद्द करण्यात आला तर दुसरीकडे विक्रीकरात वाढ करण्यात आलीये. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 2 टक्के विक्रीकर वाढवण्यात आलाय. त्याचबरोबर दारु, सिगारेट कोंल्ड्रिकवरच्या विक्रीकरात पाच टक्क्यांनी वाढ करण्यात आलीये. मात्र, हा कर पाच महिने असणार आहे असं वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं.

आज राज्यमंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत एलबीटी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. नैसर्गिक आपत्तींमुळे राज्याच्या तिजोरीवर पडेलल्या वाढीव बोजामुळे हा सरचार्ज लावण्यात आला असं मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं. राज्य सरकारने स्थानिक कर (एलबीटी) रद्द करून विक्रीकरात वाढ केलीये. पेट्रोल आणि डिझेलच्या प्रतिलिटर किंमतीत 2 टक्के विक्रीकर वाढवण्यात आलाय. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाल्यामुळे राज्य सरकारच्या तिजोरी 300 कोटींचा भर पडत आहे. त्यामुळे विक्रीकर वाढवण्यात आलाय. तसंच 1 ऑगस्ट 2015 पासून 50 कोटींपेक्षा कमी असलेली उद्योगांवर एलबीटी रद्द करण्यात आलाय. त्यामुळे स्थानिक करांचा बोजा कमी झाला. मद्य, सिगारेट, कोल्ड्रिंक्स यांचावरील 5 ते 7 टक्के स्थानिक कर कमी झाला. त्यामुळे मद्य, सिगारेट, कोल्ड्रिंक्स यांचावरील विक्रीकरात 5 टक्क्यांनी वाढ करण्यात आलीये. तसंच हिरे आणि सोन्यावर 1 वरुन 1.20 टक्के वाढ    करण्यात आलीये. या विक्रीकरातून येत्या पाच महिन्यात 1600 कोटी महसूल प्राप्त होईल असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Vinayakrao Bhavsar

    Sarkar tupashi , Karmachari,pensioners upashi

close