विदर्भ संग्राम समितीतील मतभेद उघड

January 21, 2010 9:07 AM0 commentsViews: 4

21 जानेवारी वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी बुधवारचा विदर्भ बंद यशस्वी झाला. पण आता यासाठी आंदोलन उभारणार्‍या विदर्भ संग्राम समितीमध्येच मतभेद असल्याचं समोर आलं आहे. कारण या समितीतल्या नेत्यांनी बंद यशस्वी झाला. हे सांगण्यासाठी दोन वेगवेगळ्या पत्रकार परिषदा घेतल्या. काँग्रेसचे दोन खासदार विलास मुत्तेमवार आणि दत्ता मेघे यांनी पुढाकार घेऊन विदर्भ संग्राम समिती स्थापन केली. पण मुत्तेमवारांनी आणि रणजित देशमुखांनी स्वतंत्र पत्रकार परिषद घेतली. मुत्तेमवारांच्या पत्रकार परिषदेत भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर सोडले तर समितीतले इतर कुणीही उपस्थितीत नव्हते. तर रणजित देशमुखांच्या पत्रकार परिषदेत रिपब्लिकन पार्टी, भारिप बहुजन महासंघ आणि भाजप नेत्यांनी हजेरी लावली होती. विशेष म्हणजे प्रकाश आंबेडकर दोन्हीही पत्रकार परिषदांना उपस्थित होते.

close