…अन् बिबट्याचं डोकं हंड्यात अडकलं

September 30, 2015 5:59 PM0 commentsViews:

30 सप्टेंबर : पाण्याच्या शोधात आलेल्या बिबट्याचं हंड्यातच तोंड अडकल्याची दुर्देवी आणि गंमतीदार घटना राजस्थानमधील राजसमंध जिल्ह्यात घडली. आता बिबटेबुवांचा तोंड हंड्यात अडकल्याचं पाहून गावकर्‍यांनी चांगलीचं भंबेरी उडाली आणि करमणूकही झाली. पण, पाण्याच्या घोटासाठी या मुक्या जिवाची तरफड हास्यास्पद जरी असली तरी ती न पाहणारी होती. अखेर वनअधिकार्‍यांनी या बिबट्याला बेशुद्ध करून याची सुटका केली.

rajasthan_leopard_newsत्याचं झालं असं की, राजसमंध जिल्ह्यात एका गावात पाणी पिण्यासाठी बिबटे नदी पात्रात येत असतात. असाच एक बिबट्या चुकून मानवी वस्तीत आला. पण इथं मात्र त्याची फजिती झाली. पाण्याच्या शोधात फिरत असलेल्या या बिबट्याने हंड्यात तोंड घातलं आणि त्यातच अडकला. आता तो बिबट्या असल्याने कुणी त्याची सुटका करायला धजावलं नाही. वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी ही माहिती देण्यात आली आणि त्यांनी मग बिबट्याला इंजेक्शनने बेशुद्ध करून त्याची हंड्यातून सुटका केली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close