पुन्हा नागपूर !, शांत राहण्याची विनंती केली म्हणून गुंडांनी केली हत्या

September 30, 2015 6:25 PM0 commentsViews:

crime scene30 सप्टेंबर : नागपुरातलं खूनाचं सत्र काही थांबत नाहीये. मुलं अभ्यास करत असल्यानं गोंधळ घालू नका अशी विनंती करणार्‍या नागरिकाची एका गुंडानं हत्या केलीय. त्यामुळं नागपूरातल्या सुरक्षा व्यवस्थेचे पुन्हा धिंडवडे निघाले आहेत. शहरातल्या इंदोरामधल्या बाराखोली परिसरातली ही घटना आहे.

बाराखोली परिसरातील राकेश रामटेके यांचा मुलगी एमबीए आणि मुलगा आयटीआयमध्ये शिकते. या परिसरातील काही गुंड प्रवृत्तीचे लोक परिसरामध्ये गोंधळ घालत होते. मुलांच्या अभ्यासात या गोंधळामुळे व्यत्यय येतो त्यामुळे शांत राहा अशी विनंती करण्यास गेलेल्या राकेश रामटेके यांना या गुंडांनी लाकडाने मारून त्यांचा खून केला. यात परिसरातील गुंड सुरज नानोटकर आणि त्याच्या सहकार्‍यांची या परिसरात दहशत आहे. सुरजनेच आपल्या साथीदारांच्या मदतीने हा खून केल्याचा पोलिसांच्या तपासात उघड झाल आहे. या प्रकरणात चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणामुळे नागपुरातील गुन्हेगारी किती वाढली आहे याचा प्रत्यय येतो. नागपुरातील बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थीतीही या घटनेन पुढे आली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close