बांधकामात घोळ नव्हताच, महापौर आंबेकर यांची सारवासारव

October 1, 2015 5:12 PM0 commentsViews:

snehal ambekar

1 ऑक्टोबर : लेटरबॉम्ब अंगाशी आल्यानंतर मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी सारवासारव सुरू केलीये. आपण बांधकामात घोळ असल्याचं म्हटलंच नाही असा दावा आंबेकर यांनी केलाय.

मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी अलीकडेच रस्ते बांधकामात घोळ असल्याचा दावा करत सदरील प्रकरणाची चौकशी करावी असं पत्र पाठवून शिवसेनेला घरचा अहेर दिला होता. आपली चूक लक्षात आल्यानंतर असं पत्र पाठवलंच नाही असा दावा आता आंबेकर करत आहे. रस्ते बांधकामातल्या भ्रष्टाचार चौकशीसाठीचं पालिका आयुक्तांना पाठवलेलं पत्रं हे गोपणीय असल्याचं महापौरांनी म्हटलंय. तसंच हे गोपनीय पत्रं नेमकं कोणी फोडलं याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी महापौरांनी केली आहे. मी रस्त्यांच्या बांधकामात घोळ असल्याचं म्हटलं नाही तर रस्ते खोदताना निर्माण होणार्‍या डेबरिजबद्दल प्रश्न उपस्थित केल्याची सारवासारव महापौरांनी केली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close