गोव्यातील सनातनचं आश्रम बंद करा, स्थानिकांनी मागणी

October 1, 2015 5:34 PM1 commentViews:

sanatan31 ऑक्टोबर : सनातन संस्थेच्या विरोधाचे सूर अधिकच तीव्र होऊ लागले आहे. गोव्यातल्या रामनाथी इथं असलेल्या सनातन संस्थेचा आश्रम बंद करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

सनातन ज्या प्रकारच्या कारवाया करतंय त्यामुळं तातडीनं हा आश्रम बंद करण्यात यावा अशी मागणी रामनाथ युवक संघाचे अध्यक्ष सौरभ लोटलीकर यांनी केलीय.

अशा प्रकारचं पत्र त्यांनी गोवा सरकारलाही दिलं आहे. आठवडाभरात निर्णय घेतला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही लोटलीकर यांनी दिलाय. सनातन ज्या प्रकारचं हिंदूत्व सांगतं ते आम्हाला मान्य नाही. स्थानिक लोकांचा सनातनला पाठिंबा नाही असंही ते म्हणाले.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • sukhdev

    श्याम मानव हा माणूस पण वैचारिक दृष्ट्या घसरलेला आहे. अंधश्रद्धा निर्मुलन समिती हीच एक अंध संस्था आहे. या संस्थेवर प्रथम बंदी आणायला पाहिजे. त्यापेक्षा त्यांनी मध्य आशिया आणि युरोप मध्ये जावे. तिकडे यांच्या विचारांची गरज आहे. भारतीय तत्वज्ञान हेच जीवनात आवश्यक आहे. संस्कृत भाषेबद्दल संपूर्ण जगाला आदर असून संस्कृत भाषेबद्दल सुद्धा हा माणूस उलटसुलट बोलतो आहे. या माणसाची ठाण्याला नेउन तपासणी करायला हवी. अशी माणसे समाज विघातक आहेत. त्यांची बुद्धी एकांगी विचारांनी ( हिंदू विरोधी ) ग्रासलेली आहे कृपया प्रसार्माध्यामानी या लोकांना जास्त महत्व देऊ नये.

close