मुंबई महानगरपालिकेसमोर आत्मदहनाचा प्रयत्न केलेल्या महिलेचा मृत्यू

January 21, 2010 10:02 AM0 commentsViews: 1

21 जानेवारी मुंबई महानगरपालिकेत अनुकंपा तत्वावर नोकरी मिळावी या मागणीसाठी आत्मदहन केलेल्या महिलेचा जे. जे. हॉस्पिटलमध्ये गुरुवारी मृत्यू झाला. रेणुका महाडिक असं या महिलेचं नाव आहे. मुंबई महानगरपालिकेसमोर या महिलेने सोमवारी आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. तिचे पती महानगरपालिकेच्या के पूर्व विभागात मोटर लोडर म्हणून कामाला होते. दीड वर्षापूर्वी त्यांचं निधन झालं होतं. म्हणून अनुकंपा तत्वावर नोकरीची मागणीसाठी ही महिला महानगरपालिकेत फेर्‍या मारत होती. मात्र अधिकार्‍यांच्या जाचाला कंटाळून या महिलेने आत्मदहन केलं. रेणुका महाडिकला दोन लहान मुलं आहेत. तिच्या माहेरची परिस्थितीही हलाखीची आहे. रेणुकाचे आई-वडील दोघंही अंध आहेत. रेणुका निर्मल लाईफस्टाईलमध्ये कामाला होती.

close