सेनेसोबत युती नको, भाजप आमदाराचं साईबाबांना साकडं

October 1, 2015 6:05 PM0 commentsViews:

ramesh 345623401 ऑक्टोबर : कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर शिवसेना आणि भाजपने मोर्चेबांधणीला सुरुवात केली. भाजपने स्वतंत्र्य लढण्याचा नारा दिला. आता तर भाजपचे आमदार नरेंद्र पवार यांनी युती होऊ नये म्हणून साईबाबांना साकडंच घातलंय.

शिवसेनेबरोबर युती नको, असं साकडं भाजपचे कल्याणचे आमदार नरेंद्र पवार यांचे शिर्डीच्या साईबाबांना घातलंय. नरेंद्र पवार यांनी आधीपासूनच महापालिका निवडणुकीत युती नको अशी भूमिका घेतलीये. त्यासाठीच त्यांनी शिर्डीत जाऊन साईबाबांचं दर्शन घेतलं.सत्ताधारी पक्षावरचा जनतेचा विश्वास उडालाय. त्यामुळेच यावेळेस युती नको अशी भाजपच्या कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची मागणी असल्याचं पवार यांचं म्हणणं आहे. तसंच कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपचाच महापौर होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.

दरम्यान, कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतच राहावं लागणार असल्याने 27 गावातील संघर्ष समितीने मनपा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय. काल संध्याकाळी डोंबिवलीतील मानपाडेश्वर मंदिरात संघर्ष समितीची बैठक पार पडली. त्यात निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close