तमिळ सुपरस्टार विजयच्या घरावर आयकर विभागाचे छापे

October 1, 2015 2:32 PM0 commentsViews:

Puli_701 ऑक्टोबर : तामिळ सुपरस्टार अभिनेता विजयच्या चेन्नईमधल्या घरावर आयकर विभागानं काल (बुधवारी) छापा टाकला. विजयचा ‘पुली’ हा सिनेमा आज रिलीज झालाय. विजयसह निर्माता आणि दिग्दर्शकांच्या घरावरही छापे टाकण्यात आले.

मात्र आयकर विभागाच्या कारवाईमुळे सिनेमाचे सकाळचे काही शो रद्द करण्यात आले. शो रद्द झाल्यामुळं मदुराई इथं दगडफेकीच्या घटनाही घडल्यात. छापा टाकण्यामध्ये फक्त विजयचंच नव्हता. विजयबरोबरच पुली सिनेमाच्या निर्माता आणि दिग्दर्शकाच्या घरावरही छापा टाकण्यात आला. एकूण 35 ठिकाणी आयकर विभागाने छापा टाकल्याची माहिती मिळतेय. विजयचा ‘पुली’ हा सिनेमा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत होता. सिनेमातल्या काही न दाखवलेल्या खर्चांसंदर्भा हा छापा टाकण्यात आला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close