गुंड सुमीत ठाकूरच्या भीतीने प्राध्यापक म्हस्केंनी घर सोडलं

October 1, 2015 8:01 PM0 commentsViews:

napur gunda01 ऑक्टोबर : मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमध्ये कायदा सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न वारंवार पुढे येतोय. भाजपचा पदाधिकारी आणि गुंड सुमीत ठाकूरने धक्का लागला म्हणून प्राध्यापक म्हस्केंची गाडी पेटवून दिली होती. आता म्हस्के यांनी दहशतीमुळे स्वत:चं घर सोडलंय.

प्राध्यापक मल्हारी म्हस्के यांच्या गाडीचा धक्का लागला म्हणून सुमीत ठाकूरने म्हस्केंची गाडी पेटवून दिली होती. म्हस्के यांनी याबद्दल पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर सगळा प्रकार समोर आला. एवढंच नाहीतर सुमीत ठाकूरने आपल्याला धमकावल्याचा आरोपही केला होता. सुमीतविरोधात तक्रार करण्यात आली. पण, अजूनही सुमीत फरारच आहे. त्याला पोलीस पकडू शकलेले नाहीत. उलट सुमीतच्या दहशतीमुळे आता प्रा. म्हस्केंनी स्वत:चं राहतं घर सोडलंय. 10 दिवस झाले तरी नागपूर पोलिसांना सुमीत ठाकूरचा पत्ताच लागत नाहीये. तर दुसरीकडे सुमीत ठाकूरचे वकील अवदेश केसरी यांची गाडीही जाळण्यात आली. अज्ञात लोकांनी ही गाडी जाळली होती. त्यामुळे नागपूरमध्ये नेमकं चाललंय काय, असा प्रश्न पडतोय.

IBN लोकमतचे सवाल
10 दिवस झाले तरी सुमीत ठाकूरला अटक का नाही?
पोलिसांवर राजकीय दबाव आहे का?
नागपूरमध्ये गुंडांना पोलिसांची भीती उरली नाही का?
प्राध्यापक म्हस्के यांच्यावर नागपूर सोडण्याची वेळ का आली?
मुख्यमंत्र्यांच्या शहरात कायदा-सुव्यवस्था धाब्यावर बसवण्यात आली आहे का?
लेखक, विचारवंत, सुधारक, प्राध्यापक यांनी भीतीच्या वातावरणात जगणं, हे महाराष्ट्राचं वास्तव झालंय का?

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close